पाणी आडवा पाणी जिरवा
पाणी आडवा पाणी जिरवा
काळाची मुख्य गरज आहे
पाणी अडवा पाणी जिरवा
काटकसर नी जनजागृती करू
पाणी वर्षभर नीट पुरवा...१!
वाहतील पाण्याचे पाट
निसर्गाचा दिसेल थाट
मग नाही धरावी लागणार
गड्या तुला शहराची वाट...२!
शेततळे करून साठा
नियोजन पाण्याचे करा
येईल पीकपाणी भरपूर
घर,कोठार धान्यानी भरा...३!
हिरवागार होई रानोमाळ
वृक्षवेली बहरून आली,
अवचित येता श्रावणसरी
वसुंधरा चिंब चिंब न्हाली...४!
हिरवेगार मऊ मखमली
गालिचा पसरला भूवरी,
चाले खेळ ऊन पावसाचा
सप्तरंग नभी इंद्रधनुवरी...५!
गुलाबी धुंद गंधीत वारा
अंग,अंगावर येई शहारा,
निसर्गाची किमया न्यारी
सोनेरी किरणांचा पहारा...६!
