STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

पानगळ

पानगळ

1 min
642

ऊन वारा पाऊस 

झेलून पाने थकली

उडाला हिरवा रंग

पिवळी पाने पिकली


पिकलेल्या पानांची

पानगळ सुरु झाली 

वाऱ्यासंगे पिकलेली

पाने अलगद उडाली


पिकलेल्या पानांचा

सडा झाडाखाली

पिवळ्या पानी जणू

धरतीही मस्त न्हाली


शाळा घर अंगणात

पानगळीचा कचरा

कंपोस्ट खत बनवून

करावा याचा निचरा


पानांविना ओक्सेबोक्से

झाडाचे रुप सुने सुने

फांद्यावर पुन्हा नव्याने

फुटली कोवळी पाने


दरवर्षी नेमानेच चाले

असे पानगळीचे सत्र

नव्या पर्णांनी बहरतो

वृक्ष आमचा सृष्टीमित्र!!!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन