पांडुरंग. दर्शन वारी...!
पांडुरंग. दर्शन वारी...!
1 min
365
दर्शनासाठी व्याकुळ मी
जाणिले त्या श्री हरीने
द्वार केले क्षणात मुक्त
पांडुरंग चरणी झाला लिन भक्त
सुख लाभले अपार
पाहुनी श्री मुख
उभा कटीवरी ठेवुनी हात
गोड माझा पांडुरंग
मन झाले तृप्त
तूच एक मजला आप्त
प्रेम अंतरीचे हे गुप्त
असता अंतरात लुप्त
गळा भेट तुझी माझी
खूण गाठ आहे मायेत
राहू दे अशेच मला
सदैव तुझ्याच छायेत
आता मागणे एकचि देवा
नको व्याप कोणता लावू पाठी
उभा रहाच सर्व संकटासाठी
समोर माझ्या रे तू जगजेठी
कृपा सदैव तुझी
माझ्या पाठीशी असुदे
आशीर्वादाचा हात तुझा
सदा शिरावरी माझ्या राहू दे....!
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...!