पाखरे
पाखरे
1 min
141
सकाळ प्रहरी पाखरे
घेत गगन भरारी
दाणे पिल्लांसाठी
हिंडत इकडून तिकडे घेत भरारी ।।1।।
किलबिल किलबिल करीत
पक्षांचा तो थवा
रांगाच रांगा शिस्तबद्ध
देत नयनरम्य देखावा ।।2।।
नको बंगला नको गाडी
नाही मानवा परी हव्यास सारी
तरी जगतात स्वछंदि
उंच भरारी घेतात पाखरे सारी ।।3।।
