STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

पाहिले मी तुला -----

पाहिले मी तुला -----

1 min
278

पाहिले मी तुला

तू मला पाहिले

एकमेकांच्या सहवासात

आनंदूनी बहरले ---


कधी रूसले

कधी चिडले

पण तुला पाहताच

सारे विसरले ---


संसारवेल फुलवताना

आले क्षण अटीतटीचे

हात हाती घेऊनी

जुळले नाते जन्मजन्मांतरीचे ---


जीवन गीत गाताना

माझे आयुष्य तुला लाभू दे

एक दुजे के लिए म्हणत

अतूट क्षणांची आठवण राहू दे ---


Rate this content
Log in