STORYMIRROR

sarika k Aiwale

Others

4  

sarika k Aiwale

Others

पाहिला सुर्यास्त

पाहिला सुर्यास्त

1 min
261

जाहला सुर्यास्त

सांज वेडावली

भाळला तो अस्त

प्रिया भारावली


केशरी क्षितिज

नजर गुंतली

सोहळा आनंदी

भावना रंगली


अशी एक पहाट

मनास भावते

परी अशी सांज 

मन माझे भुलते


पहाता सुर्यास्त

केशरी तो रंग

सागरी किनारी

खेळतो श्रीरंग


अलौकिक मोद

मनास हरते

विहंगम दृश्य

मन हे भुलते


पहिला आंनद

साजरा सोहळा

अलौकिक होता

सुर्यास्त पाहिला


सागर किनारी

वसले ते गाव

गणपती पूळे

होते त्याचे नाव


पहिलं पाऊल

ठेवता मातीत

जुने नाते असे

आठवे अतित


नागमोडी रस्ते

मन माझे चाले

आठवाचा झरा

नयनी वाहिले


न जाणो कोणते

क्षण ते गुंफले

मनी विचारते

नाते ते कुठले

पाहता सुर्यास्त

प्रश्न विसावला

 मनास छळता

भाव गवसला


पहिला आंनद

साजरा सोहळा

अलौकिक होता

सुर्यास्त पाहिला


साहित्याला गुण द्या
लॉग इन