पाडव्याचे मागणे
पाडव्याचे मागणे
शेतकऱ्यांचा सण आला बघा पाडवा
नववर्षाची सुरुवात त्यात आंब्याचा गोडवा
शेतातली कामे नव्याने पुन्हा सुरुवात करतो
नव्या जोमाने उत्साहाने पुन्हा कामाला लागतो
गतवर्षीचा जमाखर्चाचा हिशेब एकदा पाहतो
असेल त्या परिस्थितीत शेतात पुन्हा कष्ट करतो
थकत नाही शेतकरी म्हणून मिळते भाकर
गोडी चाखायला मात्र त्याला मिळेना साखर
थकत नाही दमत नाही रात्रंदिवस करतो काम
पिकलेल्या मालाला कधीच मिळत नाही त्याला दाम
दरवर्षी पाडव्याला तो नवी नवी गणितं आखतो
नशिबावर विश्वास ठेवून तो नवा जुगार खेळतो
या वर्षी तरी खूप पिकून कर्जाचा कमी होईल डोंगर
या एका विश्वासाने तो पुन्हा हातात घेतो नांगर
देवा, या वर्षी तरी त्याच्या पदरात सुख संपत्ती दे
दुसरे काही मागणे नाही माझ्या बळीराजाला सुखी राहू दे
