STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

पाडाला मोहर फुटतंय

पाडाला मोहर फुटतंय

1 min
455

नव पालवी फुटली यौवन लाट उकळली 

मम अंतरात झाली रसभरीत गुदगुली

ऋतु वसंत फुले अन् उन्माद मनी भरले

स्वप्नात वेडावूनी अहा अंगअंग शहारले...


हिरवीकंच अशी कैरी कचनार 

तोंडाला पाणी सुटलय रसदार 

 करतयं कोकिळ मंजुळ कुंजन

पाडाच्या मोहरास भोवरे रंजन...


मोहोर आला वावड्या उठल्या झाडही बेजार

पाडाला ही गोडी मधाळ नशा सुगंधी थरार

पानोपानी केसरी थवे अंगाअंगात भिनली

वैशाखाचा हा उष्ण चटका करतोय काह्यली..


मन माझे मानत नाही सख्याविणा 

माझी द्रिष्ट लागली पाडाला मोहना

जाऊया लदलदलेल्या अंबराईला

मोहावळा चाखून खावू भरलेला...


मोहोराने वृक्षच सजलाय पानोपानी बहरला

कोकीळेची कुहू कुहू कानी मधूर रस निथळला

वाट बघते तुमची मैना राजसा जपते मी माला

आसमंती लाली भरली आल्हादी अरुनोदय झाला

वेडावले मानस माझे ऋतूंभरा

घेतसे मन उंच आकाशी भरारी

व्याकुळ ह्रदयची तृषार्थ भिजावा  

छळते मला राया तुमचा दुरावा...


Rate this content
Log in