ओव्या भारताच्या
ओव्या भारताच्या
1 min
215
भारतात माझ्या
वाहती नद्या
करती सुजलाम सुफलाम
देशाला माझ्या||१||
भारतात माझ्या
गाणे गाती पक्षी
आळवती सूर
निखळ प्रेमाचे||२||
भारतात माझ्या
नाही प्रेमाला हो तोटा
देश माझा हा मोठा
सुंदर असे||३||
भारतात माझ्या
विविध लोक वसती
नांदती एकत्र
गुण्यागोविंदाने||४||