ओवाळिते भाऊराया
ओवाळिते भाऊराया
1 min
362
दरवर्षी दिवाळीला येतो
भाऊबीजेचा सण
बहिण भाऊ मनापासून
एकमेकांची काढतात आठवण
आईनंतरचे जगी श्रेष्ठ
असते नाते बहीण भावाचे
स्नेहाचे , प्रेमाने जोडलेले
अखंड आहे जन्मापासूनचे
किती साध आणि सरळ असत
बहिण भावाच सुंदर नात
जिथे काही न बोलता
एकमेकांना सारं काही समजत
येता सासरी भाऊराया
आनंदाला तिच्या येते उधाण
पंचारती घेऊन ओवाळते
औक्षण करते छान
भाऊ ठेवतो बहिणीच्या
डोक्यावर आशीर्वादाचा हात
आई वडिलांनंतर माहेरी मिळते
तिला प्रेम आपुलकीची सदैव साथ
