ओवाळीते भाऊराया
ओवाळीते भाऊराया
1 min
390
आज उत्सव वर्षाचा
हर्षभरा आनंदाचा,
लक्ष-लक्ष दिव्यातूनी
प्रकाशित स्वानंदाचा...
नाते-अतूट जीवनी
भाऊ-बहीण प्रेमाचे,
विश्वासाच्या परीसाने
सत्व जोपासू जोमाचे..
ओवाळीते भाऊराया
आस मनी कामनांची,
आयुष्याच्या ओंजळीत
साथ लाभावी क्षणांची....
बंधूप्रेम मज लाभे
आज उत्सवी रंगले,
करी रक्षण संकटी
दुःख जन्माचे भंगले....
मन पावन होऊनी
देई सदिच्छा अंतरी,
तुझ्या-माझ्या नात्यातले
बंध जुळता सत्वरी....
भाऊबीज आज दारी
लाभे सौख्याची पर्वणी,
भाग्यवान जगी एक
हीच पुण्याची करणी....
