ऑनलाइन साहित्यिक..
ऑनलाइन साहित्यिक..
आजकाल सगळेच व्यस्त
ऑनलाइन असण्याचे प्रस्त
जरा निवांत होता जास्त
विचार आला मनात मस्त
ऑनलाइन साहित्यिकास
मनास उमगत ना क्षणास
भाव भावताच तो रचनेस
लिहिते लगेचच कवितेस
नको प्रतीक्षा प्रकाशनास
समूहात द्यावे वाचायास
कवितेला वाव इथे खास
निर्मीतेचे सौख्य रचियेतास
काव्य खुलते बहरते इथेच
भेट जुन्यासवे वसे नव्याची
तत्काळ समूहात असल्याची
भावना बोलकी कर मनाची
ऑनलाइन साहित्यिकासही
अभिमान वाटतो असा काही
नसे भेटत प्रत्यक्षात तरीही
भाव पोहचतो सर्वात असाही
सगळे एकाच नावेचे प्रवासी
अंतरंगी वेगळेपण जप्तोसी
परी एकाच माळेचे मानिसी
माणिकमोतीयाची सर अससी
