ओले भिजले रान
ओले भिजले रान
1 min
188
वारा हलवी पान
नभातून धावत आल्या सरी
ओले भिजले रान
जाहली चिंब धरा लाजरी
मेघ सावळा घेऊन गिरकी
म्हणे अशी मी घेतो फिरकी
येऊन श्रावण भरतो बघ ना
हिरवे कंगन करी
ओले भिजले रान
जाहली चिंब धरा लाजरी
कणाकणातून रुजले पाणी
कोकीळ गाते मंजुळ गाणी
कोंब कोवळे घेऊन प्रसवे
बीज हे जमिनीवरी
ओले भिजले रान
जाहली चिंब धरा लाजरी.
