STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

*ओझ अपेक्षांच*

*ओझ अपेक्षांच*

1 min
228

आई म्हणते छान छान शिक 

बाबा म्हणतात पहिला नंबर आण

आजी म्हणते गुणाची ग बाळ ती

आजोबा म्हणतात सर्वांची हिला जाण...


कुटुंबातील सर्वांची मने सांभाळते

नाते कायम जपण्याचा प्रयत्न करते

ओझ अपेक्षांच हे साधच आहे पण

मनातून जोपासते आणि त्यातच रमते...


झाली मोठी लेक या घरची आता

राजबिंडा नवरदेव आला पाहायला

लाजून लाजून चूर झाली लेक या घरची

नवरी होणार नवरदेवाची, लागली नटायला...


बोहल्यावर चढली लग्न लागले

माहेर सोडून सासरी नांदायला लागली

सासूबाई खमक्या निघाल्या बाई

ओझ अपेक्षांच वाढणार ही चुणूक दिसली...


सजणा तर देतोय साथ सजणीला

सासरेबुवा समंजस जसे दुसरे बाबाच

झाली नवरी आता जरा जुनी आता रूळली

घेतला तिन पूर्ण घरादाराचा छान ताबाच..


साहित्याला गुण द्या
लॉग इन