STORYMIRROR

Shila Ambhure

Others

2  

Shila Ambhure

Others

ओढा

ओढा

1 min
14.5K


वाटे मजला ओढा व्हावे

करत मंजुळ खळखळ

उड्या मारत ,दौडत वहावे

बालकासम त्या अवखळ।।

      न्हाऊ घालावे खडकांना

      वाटसरुंना पाजावे पाणी

      संगीत घेऊनि निसर्गाचे

      गावी स्वछंदी,गोड गाणी।।

रहावे नितळ अन् निर्मळ

नसावा गाळही तो कोठे

सद्विचारांचे असावे पाणी

नकोत कुविचारांचे काटे।।

       वाटेन साऱ्यांना आनंद

       भेटेन जाऊन नदीमाईला

       जणू बाळ धावत जाई

       बिलगे अपुल्या आईला।।

तुषार शीतल आनंदाचे

चहुबाजूला मी उडवावे

वाटे मज होवुनि ओढा

सौंदर्य धरणीचे वाढवावे।।


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন