ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

32
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
धरणी माय सुखावली
नेसून शालू भरजरी
रिमझिम पाऊस धारा
मंद सुगंधित वारा
अवतरे भूवरती
स्वर्ग हा सारा
आषाढ मास येता
रिमझिम सुरू पावसाची
बरसणाऱ्या जलधारांनी
तहान भागे चातकाची
गर्भित झाली वसुंधरा
उजवली कुस तिची
अंकुरली इवली रोपे
शाल पांघरून मातीची
हिरवा शालू नेसून
सजली अवघी डोंगराई
रिमझिम बरसत पाऊस
गातो सुंदर मधुर अंगाई
श्रावण खुलवी रूप धरेचे
रिमझिम बरसे मेघ सावळा
नभधरतीच्या मिलनोत्सवी
सृजनाचा जणू ऋतू सोहळा