ओढ पावसाची
ओढ पावसाची


आल्या सरीवर सरी
भरली मनाची ही घागर
भेगाळलेल्या तप्त मातीत
कधी फुटेल हा पाझर.......
तप्त मातीला आणि मनाला
गारवा देणारा पहिला पाऊस
ओसाड भकास सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस.....
गडगडाट हा ढगांचा
घालती थैमान ती वीज
आतुरला हा शेतकरी
गेली उडोनिया त्याची नीज......
जीव झाला आता नकोसा
वाहे नुसता कोरडा वारा
आतातरी येणा रे पावसा
कधी बरसणार तुझ्या धारा.....
तू आसा रे कसा पडतोस
तुझा नाही काही भरवसा
चिखल मात्र भरपूर करतोस
उन्हाळ्य
ाच्या गर्मीत आता दे दिलासा....
छातीला माती लावून करून
टाकली शेतकरी राजानी पेरणी
पावसाचा प्रश्न अजूनही तसाच
आहे मात्र सर्वांच्या ऐरणी.....
मनाला हुरहुर लावणारा
जुणी आठवणी देणारा पाऊस
हळूच अलगद भिजवणारा
सर्वांना आवडणारा पाऊस.....
धो-धो कधी रिमझिम पडणारा
स्वप्नांच्या नगरीत नेणारा पाऊस
प्रेमाच्या आठवणीत रमवणारा
चिंब-चिंब भिजवून टाकणारा पाऊस...
अबोल असला तरी सार काही सांगतो
मातीला भिजवून सुगंध देणारा पाऊस
वेडापिसा व भान हरवून टाकणारा
हवाहवासा वाटणारा पाऊस...