ओढ पावसाची
ओढ पावसाची


लागली मनास ओढ पावसाची,
अन् मोर मनात नाचू लागले.
खिडकीतूनी डोकावूनी बाहेर,
कवी कविता मनात वाचू लागले.
का लागते ओढ इतकी,
मनास त्या पावसाची.
नजर मात्र शोधत रहाते,
आठवण येता सखीची.
वाटते मग भेटावे सखेस,
अन् डोळ्यात तिच्या पहात रहावे.
पाहुनी डोळ्यात दोघेही एकमेकांच्या,
एकांतात एकमेकांत हरवूनी जावे.
ओढ लागलेल्या पावसात त्या,
भिजुनी जावे दोघेही ओलेचिंब.
पहाता सखेच्या डोळ्यात,
भिजुनी जावे माझे प्रतिबिंब.
कधी बरसेल पाऊस तो,
ओढ मनास छळते.
होता पावसाची चाहूल,
मन सखेकडे वळते.