STORYMIRROR

Arman Ambardekar

Others

3  

Arman Ambardekar

Others

छावा

छावा

1 min
185


नवव्या वर्षी मुघलांच्या छावणीत

 राहून आला होता माझा वाघ,

 धाकल्या धनीचा इतिहास माझ्या

 एकदा इतिहासात डोकावून बघ


सिंहाच्या जबड्यात हात घालूनी

त्यानं दात मोजली होती,

रायगडावर परतताना ही गाथा

माझ्या शंभूराजाची गाजली होती


अवघ्या चौदाव्या वर्षी केल्या

भाषा नऊ अवगत, 

एकशे पंचेचाळीस लढाया केल्या 

त्यातील एकही न हरत


जीव देण्यास पाऊले वळली 

जिचे कालदरीला,

माझ्या वाघान वाचवलं

अशा त्या गोदावरीला


शुद्धीकरना समयी शास्त्र घेऊनी

आचार्य विष्णु शास्त्री नडले,

नेताजींना धर्मात घेण्यासाठी

धनी शस्त्राविना लढले


वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी

लिहिले होते बुधभूषण,

स्वराज्याशी फितुरी करणाऱ्यास 

होते टकमक टोकाचे शासन


रामशेज गड झुंजवत

पाच वर्ष ठेवला,

अखंड हिंदुस्थानात 

स्वराज्याचा झेंडा रोवला


Rate this content
Log in