रिकाम्या प्रेमाची रिकामी जागा....
रिकाम्या प्रेमाची रिकामी जागा....


थकलो आहे तुझ्यावर प्रेम करून
थोडी विश्रांती घेऊ देशील का ?
घेऊनी जवळी सांग मजला
एकदा मिठीत घेशील का ?
थांबावस वाटत मलाही कधीकधी
पण वेड्या मनाला लगाम कौन घालणार ?
एकानेच आयुष्यभर प्रेम करायचं
असं कसं आणि कधीपर्यंत चालणार ?
इतकं सोपं नाही ग
एकदा माझी जागा घेऊन बघ,
जास्त दिवस नाही सांगत
फक्त एक दिवस जगुन बघ.
प्रेमाच्या बदल्यात प्रेम नसेल तर
सांग काय करशील तू?
सोडून देशील विषय अर्ध्यावर
तिथेच माघार घेशील तू.
मी प्रेम मागत ना
ही तुझ्याकडे
फक्त भावना समजून घे,
वेगळं तर दोघांना व्हायचचं आहे
पण आता जुळवून घे.
मनात जे काही आहे ते
बोलत जा ना बिनधास्त,
एवढंच मागतोय तुझ्याकडे
बाकी मागत नाही ग जास्त.
एकमेकांना वेळ देऊन
सोबत चार दिवस जगूया,
काश्मीर, शिमला नाही पण
निदान आपलं गाव तरी बघुया.
खूप स्वप्ने तुझ्यासोबत पाहिली होती
पण स्वप्नांची राखरांगोळी झाली,
फाटकी नव्हती प्रेमाची चादर
तरीही रिकामी झोळी झाली.
खरच एकदा माझ्या
जागी येऊन बघ,
रिकाम्या प्रेमाची रिकामी जागा
एकदा घेऊन बघ..