नदीमाय
नदीमाय
सोडून गेली जेव्हा त्याला ती
आत्महत्येचा विचार त्याने केला,
उठून रागाने एक दिवस
नदीच्या दिशेने तो गेला.
खळखळणार नदीच पाणी
जणू त्याला हिणवत होत,
नको रे असा वेडेपणा करुस
जणू ते त्याला सांगत होत.
झोकून द्यावा जीव हा
अन् संपवाव हे जीवन सारे,
ती मायसुद्धा सांगत होती
नको रे वेड्या परत जा रे.
नदीमाय त्याला म्हणाली
आयुष्य इतकं सोपं नसतं,
असेल त्रीलोक्याचा स्वामी जरी
थोडफार दुःख त्यालाही असतं.
गेला किनारी तो नदीच्या
आणि चेहरा स्वतःचा पाण्यात पाहिला,
आली आठवण आई-बापाची
विचार आत्महत्येचा तिथेच राहिला.
धावत गेला घरच्या दिशेने
अश्रू थोडे डोळ्यात होते,
पण हसत होता मनापासून तो
जगायला मायने जे शिकवले होते.
दिसताच आई त्याला नजरेसमोर
जोरात बिलगून मिठी तिला मारली,
आत्महत्येचा या वाटेवर आणलेल्या
नदीची वाट मात्र त्यादिवशी हारली..