STORYMIRROR

Swapnita Amberkar

Others

4  

Swapnita Amberkar

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
36


ढग दाटुनी येता मन सैरभैर रानी ते पळते,

पावसाची वाट पाहताना नजर आकाशाकडे वळते.


पावसाच्या पहिल्या थेंबाची चातकासारखी ओढ लागते,

वाट पाहताना पावसाची ते ओलचिंब मन मोहरुन जाते.


पावसाची चाहुल लागता शहारे येती ते अंगावरी,

प्रेमापरी ते पावसाचे सुख झेलू दे आम्हा डोईवरी.


झाडेवेली न्हावूनी जाती त्या पावसाच्या ओढीने,

बळीराजा नांगर फिरवतो शेती सर्जा-राजा जोडीने.


क्षणात पडे तो पाऊस जीव गुतंला त्या पावसात,

पावसाच्या ओढीने मन माञ पुन्हा पडते प्रेमात.



साहित्याला गुण द्या
लॉग इन