ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
232
भेगाळलेल्या या भुईला
आज ओढ पावसाची
मग लगेच ओढ कवितेची
शब्द एकमेकांत गुंफवायची.
सरता दिवस हे ग्रीष्माचे
मनास ओढ लागे पावसाची
कोसळून पडेल असा की,
तहान मिटेल धरनी मातेची.
भिजलेल्या मातीचा सुगंध
मनास वाटे हवाहवासा
बळीराजाही सांगे घाईने
ये की लवकर पावसा.
वर्षभर वाट पाहती सारे
मनात भावनाही दाट
दिसतो मग सुंदर निसर्ग
पसरे सगळीकडे हिरवळ अफाट.
पावसाची लागली चाहूल
भिजन्यास मग आतुर पाऊल
साठलेले सारे बरसनार
मोकळे आकाश होन्याची चाहूल.
