STORYMIRROR

rajendra chavan

Others

3  

rajendra chavan

Others

नवयुग

नवयुग

1 min
11.6K

कसले आले युग या मानवाचे

स्वार्थाने भरलेल्या आयुष्याचे


मुलगी झाली म्हणोनी कपाळ हो फोडीतो

आपल्याच नशिबाला दोष हो लावितो

असला कसला बाप असले कसले जीवन त्या बापाचे


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा

मुलगी तर हा प्रकाश नवा

प्रकाशातून दिवा दिव्यातून प्रकाश

मग भेदभाव का मांडायचे


जागे व्हा काढून टाका मनातील हा भेदभाव

नष्ट करा स्वार्थी आयुष्यातील हा खोटा डाव

आता कण कण हि विझवून टाकायचे


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন