नववर्ष संकल्प
नववर्ष संकल्प
1 min
229
आलाय पहा सण गुढीपाडवा
करू नववर्षाचा संकल्प नवा
अनेक पुस्तकाचे वाचन करू
त्यावर थोडेसे मनी चिंतन करू
मनातल्या भावना नि कल्पना
विचार करून चला लेखन करू
चांगल्या कर्माने नाव गाजवा
करू नववर्षाचा संकल्प नवा
गोरगरिबांना मदतीचा हात देऊ
दीन दुबळ्याना जरा साथ देऊ
समाजात आहेत अनेक गरजवंत
सर्वाना थोडं थोडं सहाय्य करू
अनाथ लोकांची अखंड करू सेवा
करू नववर्षाचा संकल्प नवा
निसर्ग आहे तरच आपण आहोत
याची जाणीव सर्वाना करून देऊ
उपयोगी निसर्गाचा विचार करून
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करू
हा संदेश सर्वाना द्यायलाच हवा
करू नववर्षाचा संकल्प नवा
