STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

नववधू

नववधू

1 min
627

नववधू

बावरून

उभी कशी

सावरून


गोऱ्या हाती

रंगलेली

मेंदी छान

सजलेली


किणकिण

चुडा करी

हस्तपर्ण

रुळे वरी


लेऊनिया

नवा साज

नववधू

लाजे आज


हुरहुर

मनी दाटे

तरी एक 

ओढ वाटे


सोडुनिया

माहेराला

वधू जाय

सासुराला


साहित्याला गुण द्या
लॉग इन