STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Others

4  

Leena Yeola Deshmukh

Others

नवी दिशा नवी वाट

नवी दिशा नवी वाट

1 min
472

निसर्गाची किमया

मृदुगंध पावसाचा

गोड गुलाबी स्वप्नात 

उगम रम्य पहाटेचा ||१||


कोंबडा तो आरवतो

साऱ्यांनाच जागवतो

स्वप्नांच्या दुनियेतून

वास्तवा मध्ये आणतो ||२||


पावसाच्या सरींमध्ये

लपतात रवी किरणे

पक्षीही किलबिलतात

गाते कोकिळा ही गाणे ||३||


झुंजूमुंजू पहाटेला 

शब्द मनात सजली

छटा रम्य पहाटेची 

लेखणीत उतरली ||४||


मनी नवीन उत्साह

घेवून आली पहाट

पुन्हा आशेचे किरण

नवी दिशा नवी वाट ||५||


Rate this content
Log in