STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

नवा तारा

नवा तारा

1 min
328

आज क्षितिजावर झाला उदय नव्या ताऱ्याचा🌠

अत्यंत तेजस्वी देदिप्यमान अशा ताऱ्याचा 🌟

पाहून हरखले की सगळे...........

चला आता नवा सोबती आला✨💫

सुरुवातीचे चार दिवस मस्त मजेत गेले..

ताऱ्याचे तेज ही त्या अजून वाढू लागले

भट्टी काही दिवस जमली त्यांची छान

नव्या ताऱ्याची पण वाढू लागली शान💥

जुन्या तळपत्या तऱ्यांना वाटला तो धोक्याचा इशारा..

थोपवण्या त्याला म्हणाले, पुरे हा फापट पसारा..

चमकण्याची स्पर्धा आता इर्षा बनू लागली..

नव्या ताऱ्या ची आता अडचण वाटू वन लागली..

जुने जाणते तारे आता म्हणती समस्त..

नव्याचा उदय म्हणजे जुन्याचा अस्त.


पण काय खरंच असं असतं?

नाही हो..... असं काही नसतं..

जुनी जाणती असतात ,मानाचं पान..

त्यांना असते त्यांच्या ,अनुभवाची जाण..

अनुभवाने त्यांनी त्यांच्या ,नव्याला दिशा द्यावी..

नव्याची नवलाई त्यांनीही जाणावी..

जुन्या नव्याची सांगड घालून ,करावी नवी निर्मिती..

तेव्हाच निर्माण होतील ,देदिप्यमान कलाकृती...


Rate this content
Log in