Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Nimbalkar

Others

5.0  

Pandit Nimbalkar

Others

नवा भारत

नवा भारत

1 min
289


उठा चला तरूण हो, 

घेऊ क्रांतीची नवी मशाल हाती 

लढा उभारू न्यायासाठी, 

अन्याया विरुद्ध करू जण जागृती ||१||


देश रक्षणाचा घेऊन वसा,

दुश्मनाला हरवू शिकवू नवा धडा

ज्ञान विज्ञान अस्र शस्र होती 

गनिमी काव्याने देवू आपण लढा ||२||


ध्वज तिरंगा अभिमान अमुचा 

फडकवी तो बलिदानाच्या उंच कथा 

प्रेरणा ध्वजाची घेऊन आम्ही 

अंतराळात रचू नव्या शौर्य गाथा ||३||


योग, क्रिडा अन् आयुर्वेद 

उत्सव, संस्कार जगाला मार्ग देवू

सत्य, अहिंसा, सत्याग्रह 

निसर्ग, मानवतेचे नवे रक्षक होवू ||४||


आतंकवादाला समुळ नष्ट करू 

वाढवू विश्वात भारत देशाचा सन्मान 

क्रांतिवीरांचे होवू नवे पाईक 

अमुचा नवा भारत विश्वाची शान ||५||


Rate this content
Log in