STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 min
365

नव्या वर्षात पाऊलं पडे

वाजती सनई चौघडे

सरले गत वर्ष रडे


या वर्षाला नमन माझे

आनंदाचे तोरण साजे

मिळो सारे ताजे ताजे


नवी साडी नवी माडी

नवी गाडी नवा बांगला

नवा रंगू दे डाव चांगला


नवी जागा नवे शिवार

चहू बाजूने हिरवेगार

लाभो सर्वां सुखी शेजार


खाणे पिणे मौज मजा

तू राणी मी राजा

नको काही गाजा वाजा


शांत सारे सुखी जीवन

सारे कसे पतित पावन

रोज मिळो सर्वा श्रावण


देवा नको वाटू दे कोणा हेवा

येऊ दे घरात खुली हवा

खाऊ घाल आम्हा रोज मेवा


प्रार्थना तुला आगाऊ अशी

शिंकू नये रे कोठे माशी

सदैव राहतोस ना तू सदा उराशी !


एवढेच मागणे तुझे पायीं

मला नाही कोणती घायी

तूच आमची काळजी व्हायी.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन