*नशा*
*नशा*
मलाही प्यायचे आहे तुलाही प्यायचे आहे
नशा दारूत नाही रे तुला सांगायचे आहे
तुला आवेग येतो हा जराशी आत गेली की
तुला धुंदी चढे आता जरा नाचायचे आहे
जरा खोटे नको बोलू कुठे गेले तिचे फोटो
मनाच्या बंद दारांना तुला खोलायचे आहे
कसे सांगू तुला मित्रा सखीने घात केला रे
मला फोटो तिचे सारे गड्या फाडायचे आहे
असे डोळ्यात पाणी रे नसे प्रीतीत गाणी रे
तिच्या प्रेमास मित्रा रे मला खोडायचे आहे
सखा आहे तुझा मित्रा नको गाळूस अश्रू रे
सुखांचे पावसाळे रे सखा संपायचे आहे
जरा खंबीर हो मित्रा जरा गंभीर हो मित्रा
तिच्या प्रेमाविना पुन्हा तुला जिंकायचे आहे
नशा रंगात आली रे नशा अंगात आली रे
तिच्या प्रेमात प्याले दोन आता घ्यायचे आहे
