नमो शिवाजी राजे
नमो शिवाजी राजे
1 min
395
मराठी मातीचा नाद
सह्याद्री घालते साद
नमो शिवाजी राजे ।।
स्वराज्याचा विश्वास
कल्याणकारी ध्यास
नमो शिवाजी राजे ।।
गडकिल्ल्याची तटबंदी
सुख समाधानाची चांदी
नमो शिवाजी राजे ।।
शक्तीयुक्तीची दौलत
स्वराज्याची नौबत
नमो शिवाजी राजे।।
उत्तुंग यशाची भरारी
आत्मविश्वासाची उभारी
नमो शिवाजी राजे ।।
