नमन
नमन
1 min
77
नमन प्रथम । समस्त गुरूंना ।
मग विद्यार्थ्यांना । घडवीन ।।
नमन द्वितीय । माया ममतेला ।
त्यांच्या जीवनाला । खुशालीस ।।
नमन तृतीय । त्या जन्मदात्याला।
कडक शिस्तिला । मार्गस्थाला ।।
नमन चतुर्थ । त्या सरस्वतीला ।
त्या शिकवण्याला । त्या ध्येयाला।।
नमन पंचम । मूल्यसंस्काराला।
प्रत्येक कृतीला । त्या बोधाला।।
नमन षष्ठम ।नातेवाईकांना ।
त्यांच्या विचारांना । आचारांना।।