नकोच येऊस
नकोच येऊस
1 min
179
उलथापालथ करायला
जीवनात माझ्या
पुन्हा तू येऊ नकोस सखे
सावरू शकणार नाही मी तेव्हा
आतासारखा -१-
संपलेले असेल सारे
रिकामा खिसा रिकामा मी
श्रावण माझा मागायला
पुन्हा तू येऊ नकोस
तेव्हढाच त्याचा माझ्या डोळ्यांत निवास -२-
अवर्षणा, फार झाले आता
पुन्हा तू येऊ नकोस
दाहक अनुभवांनी हैराण जीव
पहायचे नाही उजाड वैराण
वाळवंट झालेले भोवती -३-
अमंगळ कल्पने
पुन्हा तू येऊ नकोस
मन अस्वस्थ अस्थिर करायला
अशुभ घटनांचा पट
उभा करायला -४-
