नको तू समजू कधी एकटा"
नको तू समजू कधी एकटा"
नको तू समजू कधी एकटा मज
दे हातात हात तू मजशी हसाया
बस एवढेच कर मरनातून निघाया
सखे उभारू निवारा नव्याने जगाया...
प्रिये खरे काय ते सांग मजला
मनी काहूर पुन्हा आजच्याला
तुझे वागणे हे कळू दे मनाला
कसा प्राण लावू अता मी तुला...
कळेना किनारा किती दूर आहे
जगावे खुशीने कश्याची चिंता
प्रितीच्या जगी या झुरावे कशाला
जणू दुःख तूझे मला छळविता...
उरी घाव झेलून राहू नकोस दुःखी
कसे सावरावे मनाच्या डोहाला
कितीदा डूबता वाचवू नव्याने
कसे हात देवू जला वादळाला...
