नकळत कविता माझ्या हातून झाली
नकळत कविता माझ्या हातून झाली
1 min
315
कविता करता करता
फसगत झाली
आयुष्यात माझ्या
वाट माझी चुकली अन् त्यात
मी कविता करायला शिकले
दुःख माझी पाठ ना सोडी
सुख माझ्या जवळ ना येई
एक दुःख सरत नाही तर
दुसर दुःख उभे राही
अनेकदा सुखाची आस
लागते माझ्यासमोर तेच
अलगद ती निसटून जाते
कधीकधी ह्यावर माझं मलाच हसू येई
वाटलं मला मनाचा हा दाह रिकामा करू
पण फसगत होई माझी दरवेळी
खरंच वाट माझी ही आडवळणाची
नकळत कविता माझ्या हातून लिहिली
