नजरभेट
नजरभेट
1 min
165
वळणावरून जाताना
अचानक भेटलास तू
आणि जीवन वृक्षाला
उभारी आली
अबोल मनाची सोनकळी
चांदण्यात न्हाली
डोळ्यातल्या भावनांना
बांध घालताना
आवरले नाहीत
अश्रू पापण्यांना
पण अंतरीची ओढ
तुला कळली नाही
तुझी माझी प्रीती
कधीच जुळली नाही
पण का? का? असे वेड
लावलेस मला
तुझ्या जाण्याने
जीवनरस आटला
पण ही वेडी प्रीती
करेल तुझाच धावा
जसा चातक करतो
स्वाती बिंदूचा पाठपुरावा
वाटते केव्हातरी येईल
दया तुला
देशील का प्रतिसाद
माझ्या वेड्या प्रीतीला
कारण अखेर मानव
कवटाळतो ना आशेला
