STORYMIRROR

Karishma Dongare

Others

3  

Karishma Dongare

Others

नजर लागली पंढरीच्या वारीला

नजर लागली पंढरीच्या वारीला

1 min
234

नजर लागली पंढरीच्या वारीला

कुठे हरवली भक्ती पांडुरंगाची

कोणी नसे आज या पंढरीत

वारीला सर नव्हती कशाची.||१||


नजर लागली पंढरीच्या वारीला

सुख वाटे भीमा नदीचे वाळवंट

दुर जाई नजर सारे मोकळेच

सुखा पडलाय प्रत्येकाचा कंठ.||२||


नजर लागली पंढरीच्या वारीला

त्यार्यासारखी चमकणारी पंढरी

कुठे भक्तीत बुडालेले वारकरी

कुठे पायवाट ती गजबजनारी.||३||


नजर लागली पंढरीच्या वारीला

ना कधी मोगल अडवू शकले

ना कधी आडवे आले इंग्रज

कारोनाने धुमाकूळ किती घातले.||४||


नजर लागली पंढरीच्या वारीला

नाही आवाज येत आता भजनाचा

टाळही वाट बघून थकले रे

आवाज नाही ऐकला चीपळ्यांचा.||५||


 नजर लागली पंढरीच्या वारीला

आठवे सारे ते सोहळे पहिले

डोळ्यांच्या कडा येतात भरून

पांडुरंगा ये धावून खूप सोशिले.||६||


Rate this content
Log in