नियतीचा खेळ
नियतीचा खेळ
1 min
806
मनात खूप विचार येतात पण
कागदावर ते उतरू शकत नाही
उदास वाटतं मन खूप
पण मनातलं कोणाला सांगू शकत नाही
रडावसं वाटतं खूप
पण जवळच अस कोणी नाही
आनंदाने उड्या माराव्या वाटतात
पण अंगण माझा नाही
रागावसा खूप वाटतं
पण राग मला येत नाही
ओरडवसा खूप वाटतं
पण आपल कोणी जवळ नाही
खुश खूप व्हावसा वाटतं
पण आनंद द्यायला कोणी नाही
नियतीचा खेळ असे निराळा
ओळखता मला येत नाही
