STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

नियम असावेत का...?

नियम असावेत का...?

1 min
186

नियम असता आपल्या जीवनी 

शिस्त येती बहुधा रे कामात 

भिस्त तयाची कधी असते मनात 

पण असावेत का नियम आपल्यात?


प्रश्न अधिक आहे विचारी

नसावे ओझे ते पाळण्यात 

पाडतो विचारात आपली डोकी 

असावे का बंधन मोडण्यात?


व्यवसाय कोणताही करण्यात 

असावे स्वातंत्र्य बोलण्याचे 

नसावेत नियम बेकारपणाचे 

वागण्यात का पाढे नियमाचे? 


आरोग्याचा विचार विचारी 

खयालखुषीचे सहनशील नियम 

शुद्ध शरीर विना विकार सुदृढ 

खाण्यापिण्यात असावेत का नियम?


असले जरी अनेक अडथळे

मूल्यांचा वावर असावा चारित्र्यात

व्यक्तिमत्वाचा विकास बहू चोख 

असावेत काही नियम जीवनात


Rate this content
Log in