STORYMIRROR

Saroj Gajare

Others

3  

Saroj Gajare

Others

निवडणुकीचं वारं ....सैराट

निवडणुकीचं वारं ....सैराट

1 min
622


निवडणुकीचं वारं आलंय, सारं सैराट झालंय

झालं झिंग झिंग झिंगाट , झिंग झिंग झिंगाट,सैराट झालंय ।।धृ ।।


हे उरात होतेय धडधड , आरं निवडणूक आलिया

गल्लोगल्ली रस्तोरस्ती , गाड्या सुसाट धावतीया

सत्तर वर्ष रंजून गांजून लोकशाही गुंत्यात बधिर झालोया

आरं सदाच बुडतोय , गरिबीत पिचतोय

अंगात आलंया ।।१।।झालं झिंग झिंग...


आता उतावीळ झालोया , पेट्या भरून ठेवल्याया

मतदार राजापुढं वस्तीत ,लई अदबीनं वागतोया

चिरीमिरी देऊन त्यासनी, आशेला लावलंया

समद्या गावात ,म्या लई घोरात, अंगात आलंया ।।२।।आरं निवडणूक वारं ...


समद्या गावाला झालिया, मले खाली खेचायची घाई

कुणी देणार का हो मले, तुमची अमोल मतं काही

कुणी घेणार का हो त्याबदली , माह्या नोटा काही

आता निवडणूक आलिया , म्या वॉन्टेड झालोया

चौकीवरून पोलिसांना,कल्टी मारून आलोया ।।३।। आरं निवडणूक वारं....


निवडणूक वारं आलंया, घोषणांची बरसात झालिया

लाडात वाढलेलं लेकरू,उन्हातान्हात राबतंया

कोरडया दुष्काळात उन्हाच्या कडाक्यात घामानं भिजतंया

सत्तापिपासू भुतावळ स्वार्थापायी दानव झालिया ।।४।। आरं निवडणूक वारं...


आता मतदार जागा झालाय, भयचिंता सोडून आलाय

निर्धाराच्या वाटेवर निर्भीड झालाय

स्वमनगटावर विश्वासानं,नेता पारखून घेणाराय

हक्काचं ठेवून भान , चार दिसाच्या आमिषाला नाही भुलणाराय।।निवडणूक वारं ......



Rate this content
Log in