STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

4  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

निवडणुकीचा पोळा

निवडणुकीचा पोळा

1 min
41.9K


आला निवडणुकीचा पोळा

झाली नेतेमंडळी गोळा

कोणाला सजवायचं

कोणाची काढायची वरात

होऊ लागली एकच

चर्चा ही दिनरात

प्रत्येकाचा आहे

जनतेच्या मतावर डोळा

आला निवडणुकीचा पोळा


जो तो तयार आहे बांधून

गुडघ्याला बाशिंग

तिकीट मिळालं नाही

तर उगारतो बंडखोरीची शिंगं

क्षणार्धात करून

निष्ठेचा चोळामोळा

आला निवडणुकीचा पोळा....


लागून जाते कामाला

डोमकावळ्यांची जमात

जोमाने होऊ लागते

आश्वासनांची खैरात

भांबावून जातो

मतदार राजा भोळा

आला निवडणुकीचा पोळा....


दर पाच वर्षांनी

गातात तेच गाणे

वर्षानुवर्षे मलिदा

खातात हे सुखाने

जनतेच्या स्वप्नांवर

फिरवितात बोळा

आला निवडणुकीचा पोळा....


Rate this content
Log in