निस्वार्थ आनंद
निस्वार्थ आनंद
लोभस ते फूल
मोहवी फुलपाखरास
सोडूनी सारे बंध
ते खुणावती त्यास
गुलाबी हसरे फूल ते
उमलण्याच्या तयारीत
फुलपाखराने त्यास
घेतले अखत्यारीत
बागेतील फुलपाखरू
म्हणे काय रे वेड्या फुला
अनेक रंगांनी सजून का
खुणावतोस रोज मला
तुझ्या-माझ्या प्रीतीचे
जपलेले ते गूज
सांजव्यात या ऐकू दे
बेधुंद असे अलगूज़
पराग तुझ्यात दडलेले
शोधून मी त्यासी
मकरंद मग प्राशूनी
त्रुप्त होतसे मानसी
नखरे तुझे फुलपाखरा
मी आहे सर्व जाणिले
पण तुझ्या प्रीतीत मोहरूनी
मी एकरूप त्या मानिले
फुलपाखरू मधुरस,
मकरंदाचे प्राशन करी
निस्वार्थ आनंद देण्याची
कला पण फुलाच्याच अंतरी......
