निसटून आयुष्य गेले
निसटून आयुष्य गेले
1 min
272
बघा आता ताई होते
आता कशी काकी झाले
तरुणीच्या लिस्ट मध्ये
आपोआप मागे गेले
हातातून निसटले
पाहा आयुष्य पळून
पन्नाशीच ओलांडली
मागे बघते वळून
कोणी कितीही बोलले
केली कुरबुर कोणी
मस्त एकत बसावे
गाणी मराठी ती जुनी
काही कारण नसता
द्यावी टाकूनच रजा
मुलांसोबत अपुल्या
मस्त करावी मजा
आहे भरून घेतल
ओझे ते अनुभवाचे
हात मदतीचा मागे
ज्यांना दुःख आयुष्याचे
