निसर्गराजा
निसर्गराजा
1 min
337
मेघ करी बरसात!
रूप पालटे सृष्टीचे!!
पाणी वाहे नद्यांतूनी!
रूप खुले डोंगराचे !!1
हिरवाई लेऊनी ती !
तृप्ती धरणीला आली!!
नव्या नवतीच्या गाली!
लाज जशी उमटली!!2
शाखा पानांतूनी मोती!
टपटप ओघळले !!
सागराच्या लाटा बघा!
चंद्र भेटण्यां उसळले!!3
कंप धरणीचा होतो!
कुठे लाव्हा उसळतो!!
हिम प्रपाती निसर्ग !
रौद्र रूप दाखवितो!!4
पुढे निसर्गाच्या सदा !
नम्र होऊनी रहावे!!
खुजा मानव सृष्टीत !
सत्य नेहमी जाणावे !!5
