निसर्गाचं देणं
निसर्गाचं देणं
1 min
132
निसर्गाची लीला न्यारी
कृपा त्याची धरेवरी
फुले निसर्ग किमया
हिरवळं भूमीवरी. //१//
फूले निसर्ग किमया
वसुंधरा बहरली
शालू हिरवां नेसुणं
वाटे नवरी नटली .//२//
धरतीच्या कुशीतूनं
येई कोवळां अंकुरं
मिळे हवा पाणी उबं
रोप वाढे गरगरं . //३//
झाडं येई बहरूनं
दिसे शिवारं शोभूनं
किलबिल पाखरांची
उडे बेभानं होऊनं . //४//
सजवितो धरतीलां
कर्ता आणि करवितां
निसर्गाचं वरदानं
तोच सृष्टीचा निर्मातां .//५//
तीन ऋतु निसर्गाचे
आहे निसर्गाचं देणं
ऊन पाऊस हिवाळा
सजीवांचं यातं जीणं .//६//