निसर्गाची किमया सारी।
निसर्गाची किमया सारी।
1 min
500
निसर्गाची किमया सारी।
ऊन्हानंतर पावसाच्या सरी।
शिंपल्यात सापडे मोती।
खाणीत कोळसा हिरा बनती।
निसर्गाचीच किमया सारी।
फुलांवर रंगाची उधळण न्यारी।
जलचर ही पाण्यात तरंगती।
पक्षी हवेत गिरक्या मारी।
सागर लाटांचा खेळे खेळ।
गुज दरीत मारे कल्लोळ।
सौंदर्याचे हे दान सोनेरी।
निसर्ग लुटली या धरेवरी।
