STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

निसर्गाची हाक ऐका

निसर्गाची हाक ऐका

1 min
187

आधी करता

 आपलीच मनमानी

 करता पर्यावरणाची

न भरून येणारी हानी

 आणि मग वाचव म्हणून

 देवापुढे गाता रडगाणी


आधी करता

 निसर्गाचे भक्षण

 मग कोण करणार

 तुमचे रक्षण 

लावा झाडे 

फुलवा निसर्ग 

आणि करा 

स्वतःचे संरक्षण


 आधी करता

 पाण्याचे प्रदूषण 

आणि एकमेकांना

 देतात दूषण 

हे मुळीच नाही 

मानव जातीला भूषण


 आधी करता हनन

पक्षी आणि प्राण्यांचे

 चोचले पुरवता

 स्वतःच्या जिभेचे

 मग आता पेरले

 तेच उगवले

स्वतःचा माणूस जाताच

 किती दुःख झाले


अजून तरी जागे व्हा

 निसर्ग साखळी तोडू नका

 डोंगर फोडू नका

 झाडे तोडू नका

 कान डोळे उघडे ठेवा

 निसर्गाची हाक 👂ऐका 

जे मिळाले आहे फुका 

ते व्यर्थ दवडू नका


Rate this content
Log in