निसर्ग
निसर्ग

1 min

300
अताशा वाटू लागले मज
नितळ शांततेत घर असावे..!!
सहवास फक्त सृष्टीचा
बाकी कोणीच नसावे..!!
सांडावा सुखाचा सडा
मन आनंदात रमावे..!!
एकावे स्वर पाखरांचे
दृश्य मनोहर न्याहाळावे..!!
यावा अलवार वारा
वाहावा स्वप्नाचा पसारा..!!
निळ्या रंगात रंगावा
हा अवकाश सारा..!!
प्रेम रंगावे निसर्गाशी
अंतःकरण शांत व्हावे..!!
गुपित सुगंधी कस्तुरीचे
निसर्ग गृहात मिळावे..!!