निसर्ग
निसर्ग
1 min
407
खेडेगावचा नजारा
फुलतो कसा पिसारा
दुरून बघता गाव
दिसतो निसर्ग किनारा
गावातील सहवास
मनोमनी आठवा
पहाटेचा मंद आवाज
आपल्या कानी साठवा
सकाळी उठताच
होई भेट झाडांची
बघून त्यांना हळूच
आठवण होई गाण्याची
सारवलेलं मातीचं घर
गोठ्यात असलेल्या गाई
चुलीवरच स्वयंपाक
करायची असते घाई
सुर्याची किरणे पडती
झाडाच्या आडोशातुनी
हिरवीगार दिसती झाडे
निसर्गरम्य होऊनी
तलाव असतो बाजूला
जाऊन बसू काठावर
संथ पाय पाण्यात टाकू
मन मोकळं करू शकू
